मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ रिपाइं उतरली रस्त्यावर

मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ रिपाइं उतरली रस्त्यावर

परंडा दि.३ (प्रतिनिधी) -  मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) परंडा तालुक्याच्यावतीने पक्षाचे राज्य चिटणीस संजयकुमार बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली दि.३ रोजी शहरातील विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर तहसिलदार घनश्याम आडसूळ यांना मागण्यांचे निवेदन देण्यात दिले. यावेळी सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते. यावेळी रिपाइंच्या आयटी सेल जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे, उत्तम ओव्हाळ, बाबा गायकवाड, तानाजी सोनवणे, दादा यशवद, संजिवन भोसले, काशिनाथ सातपुते, धनाजी सरवदे, आण्णासाहेब भालेराव, संतोष चतुर, बबन भोसले, हनुमंत शिंदे, गणेश रंदील, लखन सरवदे, विलास भोसले, बाबासाहेब शिंदे, विकास गोमासे, शहाजी निकाळजे, श्रावण दाभाडे, शहाजी दाभाडे, दिपक ठोसर, निलेश गायकवाड, वसंत चोळसे, अविनाश ओव्हाळ, संजय यशवद, तात्या भोसले, दादा बगाडे, दत्ता शिंदे, भुषण बसवंत, भिमराव भोसले, चंद्रकांत परिहार, सुनिल आडाळे, विश्वास साळवे, अभिजित बनसोडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !