ढोकी प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन - साळुंके

ढोकी प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन - साळुंके 

परिसरातील रूग्णांना मिळणार दर्जेदार सेवा 

धाराशिव दि.४ (प्रतिनिधी) - तालुक्यातील ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात होती. त्यामुळे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या आदेशानुसार या प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करुन त्याचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर केले आहे. तर तेथे ३० खाटांचे सुसज्ज ग्रामीण रुग्णालय उभारण्यात येणार आहे. तसेच या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत ६ उपकेंद्राच्या कार्य कक्षेतील गावांमधील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याची माहिती शिवसेना (बाळासाहेब) चे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी दिली. 


ढोकी हे गाव लातूर-पुणे राज्य महामार्गावरील मोठे गाव आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही मोठे आहे. ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तडवळा, खेड, किणी, गोवर्धनवाडी, खामगाव व रूई या ६ उपकेंद्राचा व त्या अंतर्गत २४ गावांचा समावेश आहे. त्यामुळे ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन होऊन येथे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात यावे अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. ही मागणी विचारात घेऊन पालकमंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून ग्रामीण रुग्णालयात रूपांतर केले आहे. त्यामुळे या भागातील रुग्णांना तातडीने रुग्णसेवा मिळणार असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. मंत्री सावंत यांच्या प्रयत्नांमुळे आता रुग्णांना धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात येण्याऐवजी तेथेच उपचार मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती साळुंके यांनी सांगितली.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !