दिवाळीनिमित्त मुलांसाठी किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन

दिवाळीनिमित्त मुलांसाठी किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन

धाराशिव दि.७ (प्रतिनिधी) - दिवाळी सणाला लहान मुले मातीचा किल्ला बनवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी जागवतात. रायगड, प्रतापगड किल्ल्यांची हुबेहुब प्रतिमा साकारताना चिमुकल्यांमध्ये दडलेल्या कल्पक कलेला वाव मिळतो. मात्र, सध्याच्या मोबाईल युगात दिवाळीचा किल्ला हरवला आहे. मात्र तुलसी सामाजिक संस्थेने किल्ले बनवण्याची स्पर्धा आयोजित केली असल्याची माहिती संयोजक नितीन काळे यांनी दिली आहे.

तुलसी सामाजिक संस्थेच्यावतीने या स्पर्धेसाठी प्रथम ११ हजार १ रुपये तर द्वितीय ७ हजार रुपये व तृतीय ५ हजार रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सध्याच्या पिढीला आमची दिवाळी माहिती नाही. पूर्वी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये किल्ला बनवून सुट्टी संपेपर्यंत त्या किल्ल्याचे मावळे बनून किल्ला सांभाळत होते. मात्र, सध्याच्या काळात मुले ही मोबाईल फ्रेंडली झाली असून जुने खेळ व दिवाळीची परंपराही लयाला जात आहे. त्यामुळेच ही किल्ले बनवा स्पर्धा आयोजित केली असल्याचे काळे यांनी सांगितले.

या स्पर्धेसाठी ५ ते १५ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. ८ ते १५ व १५ ते पुढील खुला अशा २ गटांमध्ये या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त मुलांनी नोंदणी करुन आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन काळे यांनी केले आहे.  या स्पर्धेसाठी किल्ल्याचा प्रकार फलकावर नमुद करावा (ऐतिहासिक व शिवकालीन, भुईकोट किल्ले व काल्पनिक किल्ला), वयोगट ८ ते १५ व १५ ते पुढील वयातील, किल्ल्यांचे फोटो दिलेल्या नंबरवर पाठवावेत. तसेच आडवे, २ उभे, १ शॉर्ट व्हिडीओ पाठवावेत. यासाठी स्पर्धेसाठी नोंदणी केलेला व भाग घेतलेला स्पर्धक असणे आवश्यक, किल्ला बनविण्यासाठी कुठल्याही वस्तू वापरावर बंधने नाहीत. परिक्षक ऑनलाईन परिक्षण करतील. परिक्षण झाल्यावर परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील. दिलेल्या तारखेपर्यंत ८००९६७०३०३ या नंबरवर फोटो पाठवावेत. किल्ल्यांचे फोटो एच.डी. फॉरमॅटमध्ये पाठवावेत व स्पर्धकांना नोंदणी करताना नाव, पत्ता, मोबाईल नंबर समाविष्ट करावा असे आवाहन काळे यांनी केले आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !