वीज पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचा कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात ठिय्या
- Get link
- X
- Other Apps
धाराशिव दि.८ (प्रतिनिधी) - तालुक्यातील काजळा शिवारासाठी वीजपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात दि.८ नोव्हेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
धाराशिव तालुक्यातील काजळा येथील शेतकऱ्यांना गेल्या २९ दिवसांपासून सुरळीत वीज पुरवठा होत नसल्यामुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळवून देखील कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही. काजळा येथील सबस्टेशनवरून शिवारातील शेतीसाठी वीज पुरवठा केला जातो. याच सबस्टेशनवरून कोळेवाडी व डकवाडी गावाचा अतिरिक्त भार जोडल्यामुळे वीज नेहमीच खंडित होत आहे. याकडे महावितरणकडून दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आणून देत तात्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, लालासाहेब मडके, राजेश शहागुंडे, गुरुप्रसाद करंडे, उमेश पवार, चांद तांबोळी, संतोष पाटील, मनोज कदम, चंद्रकांत लोमटे, दशरथ कोळी, बाळासाहेब शेषणी, रवींद्र आहेर, राजाभाऊ भोसले, जोतीबा जाधव, संजय माळी, महादेव माळी, शुभम इंगळे, बाळासाहेब देशमुख, संतोष पाटील, शुक्राचार्य शेडगे, आप्पा पवार, संतोष क्षीरसागर, रणजित पाटील, रामेश्वर शेळके, आत्माराम माळी, अरविंद माळी, महेश हजारे, गणेश आहेर, ज्ञानेश्वर शेळके, अविनाश शेळके, शुभम पाटील, राहुल बचाटे, तानाजी क्षीरसागर, खयुम सय्यद आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps