शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज सादर करावेत

शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज सादर करावेत


                    
धाराशिव दि.१ (प्रतिनिधी) - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या दोन विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता आदी योजनेचे सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात अर्ज भरण्यासाठी http://mahadbtmahit.gov.in हे संकेतस्थळ दि.११ ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे.
जिल्ह्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्तांनी आपले अर्ज संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने भरावेत असे आवाहन केले आहे. 
अनुसूचित जाती,विमुक्त जाती व भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज http://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावर विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने भरून त्याची हार्ड कॉपी आपल्या महाविद्यालयाकडे जमा करावी. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी अर्ज हे प्रस्तुत कार्यालयाकडे सादर करण्यापूर्वी छाननी करून शिष्यवृत्तीस पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयास सादर करावेत. महाविद्यालयात प्रवेशित एकही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, याची नोंद घ्यावी. विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास व त्यामुळे एखादा पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग जबाबदार राहणार नाही, असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी सांगितले आहे.
                      

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !