राहत्या घराची जागा नावे करण्याच्या मागणीसाठी १६ नोहेंबरपासून आमरण उपोषण


राहत्या घराची जागा नावे करण्याच्या मागणीसाठी १६ नोहेंबरपासून आमरण उपोषण 

नळदुर्ग दि.८ (प्रतिनिधी) - नळदुर्ग शहरात गोर गरीब जनता गेल्या ७० ते ८० वर्षापासून शासकीय जागेवरती अतिक्रमण करुन पत्र्याच्या शेड व कच्च्या दगड मातीचे बांधकाम करून राहत आहेत. ती जागा त्यांच्या नावावर करण्यात यावी. तसेच रमाई आवास योजनेचा लाभ त्यांना मिळवून देण्यात यावा या मागणीसाठी नळदुर्ग नगर परिषदेसमोर दि.१६ नोव्हेबरपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांमार्फत दिला आहे.
नळदुर्ग येथील गोरगरीब जनता शासकीय जागेवर राहून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे. अशा गरीब कुटुंबांना महाराष्ट्र व केंद्र शासनाच्यावतीने रमाई आवास घरकुल योजनेचे लाभ मिळावा यासाठी शासन सर्वोतपरी प्रयत्न करीत आहे. परंतू नळदुर्ग शहरात रमाई आवास घरकुल योजनेचे चक्क तीन तेरा नव अठरा अवस्थेत दिसून येत असल्याने नागरिकांत व लाभर्थामध्ये संतापाची लाट उसळली आहे.  तसेच प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या हक्काचे व पक्के घर मिळावे यासाठी केंद्र व महाराष्ट्र शासनाने खुप चांगली योजना सुरू केली असून या योजनेचा लाभ प्रत्येकाला मिळायला पाहिजे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज संपूर्ण देशभरात रमाई आवास घरकुल योजनेचे कामे चालु आहेत. येथील लाभार्थी कुटुंबाना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी खुप प्रयत्न केले. मात्र कोणताही अधिकारी किंवा राजकीय पुढाऱ्यांनी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे  राहत्या घराची जागा नियमाकुल करावी. तसेच त्या ठिकाणी वरिल योजनेचा लाभ मिळवून द्यावा या प्रमुख मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. मात्र नळदुर्ग शहरांमध्ये अनेक वर्षापासून रमाई घरकुल आवास योजना राबवण्यासाठी नगर परिषद असमर्थ ठरली आहे. विशेष म्हणजे रमाई आवास घरकुल योजनेचे लाखो रुपये नगर परिषदेच्या पेटीत धुळखात पडून आहेत. ज्यांच्याकडे ८ अ चा दाखला आहे अशा लाभार्थाना या योजनेचा लाभ मिळतो. परंतू रमाई विभागातील कर्मचाऱ्यांनी लाभार्थाना वेगळीच कारणे सांगून नागरीकांची दिशाभूल केली आहे. अशा कर्मचार्‍याना एकतर निलंबित करावे किंवा टेबल बदली करावे. आज तागायत शासन दरबारी कुठल्याही प्रकारची नोंद नगर पालिका घेत नाही. अनेक वेळा उपोषणे, आंदोलने व मोर्चे काढण्यास आले. तरी देखील दलित जनतेचा वाली कोणी पुढे आला नाही. याच्या निषेधार्थ दि.१६ नोव्हेंबरपासून बुद्ध नगर, भीम नगर, डॉ आंबेडकर नगर, इंदिरा नगर, दुर्गा नगर, वसंत नगर व साठे नगर आदी भागातील गोरगरीब जनता नळदुर्ग नगर परिषदेच्या समोर आपल्या हक्कांच्या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण  करणार आहे. यावर धम्मसागर बनसोडे, सुनील भांगे, नितीन कांबळे, प्रियानंद जाधव, कोंडीबा कांबळे, दिलीप भांगे, राजकुमार गायकवाड, सचिन यादव, आप्पाराव बनसोडे, नागनाथ कांबळे, शोभा यादव, विलास बनसोडे, फुलाबाई गुरव, अरुण भांगे, संगीता कोळी, संजुबाई गायकवाड, प्रफुल्ल बनसोडे, सीमा लोंढे, प्रमोद लोंढे, ताई कांबळे, बाबासाहेब बनसोडे, शिलाबाई वाघमारे आदींसह इतरांच्या सह्या आहेत.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !