धन्वंतरी दिनानिमित्त ३८ जणांनी केले रक्तदान धाराशिव दि.७ (प्रतिनिधी) - धन्वंतरी दिनाचे औचित्य साधून येथील आयुर्वेद व्यासपीठ व रोटरी क्लबच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरामध्ये ३८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.धाराशिव शहरातील आनंद नगर भागातील सिध्दांत आयुर्वेद हॉस्पीटलमध्ये हे शिबीर घेण्यात आले. प्रारंभी धन्वंतरी प्रतिमेचे पुजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्तावीक वैद्य वैशाली बलवंडे यांनी केले. या रक्तदान शिबीरासाठी आयुर्वेद व्यासपीठ धाराशिवच्या अध्यक्षा वैद्य पल्लवी कोथळकर, देवगिरी विभागाचे अध्यक्ष वैद्य प्रशांत कोथळकर, वैद्य गजानन कुलकर्णी, वैद्य राजेश पवार, सचिव वैद्य शतानंद दहिटणकर, वैद्य अविनाश नागणे, वैद्य अमित इंदापूरकर, रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ चे प्रांतपाल रविंद्र साळुंके, रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. अनार साळुंके, सचिव डॉ. मीना जिंतूरकर यांनी पुढाकार घेतला.धाराशिव येथील सह्याद्री ब्लॅड बँकेच्यावतीने रक्त संकलन करण्यात आले असून रक्तदान शिबिराचे हे १० वे वर्षे आहे.

धन्वंतरी दिनाचे औचित्य साधून येथील आयुर्वेद व्यासपीठ, धाराशिव व रोटरी क्लबच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात ३८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
धन्वंतरी दिनाचे औचित्य साधून येथील आयुर्वेद व्यासपीठ, धाराशिव व रोटरी क्लबच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. शहरातील आनंद नगर भागातील सिध्दांत आयुर्वेद हॉस्पीटलमध्ये हे शिबीर घेण्यात आले. धन्वंतरी प्रतिमा पुजनाने शिबीरास प्रारंभ करण्यात आला. या रक्तदान शिबीराचे हे दहावे वर्ष आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तावीक वैद्य वैशाली बलवंडे यांनी केले. या रक्तदान शिबीरासाठी आयुर्वेद व्यासपीठ, धाराशिवच्या अध्यक्षा वैद्य पल्लवी कोथळकर, आयुर्वेद व्यासपीठ देवगिरी विभागाचे अध्यक्ष वैद्य प्रशांत कोथळकर, वैद्य गजानन कुलकर्णी, वैद्य राजेश पवार, सचिव वैद्य शतानंद दहिटणकर, वैद्य अविनाश नागणे, वैद्य अमित इंदापूरकर, रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ चे प्रांतपाल रविंद्र साळुंके, रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. अनार साळुंके, सचिव डॉ. मीना जिंतूरकर यांनी पुढाकार घेतला.
धाराशिव येथील सह्याद्री ब्लॅड बँकेच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !