उमेदच्या ५०१ बचत गटांना भारतीय स्टेट बँकेने १० कोटी रुपयांच्या कर्जाचे केले वाटप

उमेदच्या ५०१  बचत गटांना भारतीय स्टेट बँकेने १० कोटी रुपयांच्या कर्जाचे केले वाटप

धाराशिव दि.८ (प्रतिनिधी) - उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण

जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्ह्यातील ५०१ महिला बचत गटांना भारतीय स्टेट बँकेच्या माध्यमातून १० कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते दि.८ नोव्हेंबर रोजी करण्यात आले.  

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये या कर्जाच्या धनादेशाचे वितरण करण्यासाठी जिल्ह्यातील बचत गटातील महिलांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापक मेरी सगाया धनपाल, उप व्यवस्थापक प्रियकुमार सारीगाला, विभागीय व्यवस्थापक नरसिंग कुमार मेहता, जिल्वहा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे व अग्रणी बँकेचे मुख्य प्रबंधक दास आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. ओंबासे यांनी बचत गटांनी शासनाच्या पी.एम. जी.ई.पी व सी.एम.जी.ई.पी या योजने अंतर्गत जास्तीत जास्त प्रस्ताव बँकांकडे सादर करावेत असे आवाहन त्यांनी केले. तसेच भारतीय स्टेट बँक ही बचत गटांना कर्ज मंजुरी देण्यास सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे धाराशिव जिल्हा हा आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत असल्यामुळे बचत गटांनी शासनाच्या बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा फायदा घेऊन जिल्ह्यास विकसित जिल्हा बनविण्यास मदत करावी, असे आवाहन बचत केले. 

......................

भारतीय स्टेट बँकेने ५० लाख रुपये व त्यावरील व्यावसायिक कर्जासाठी धाराशिव येथे नवीन एस.एम.ई. शाखा सुरू केली आहे. या शाखेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी बँकेचे वरिष्ठ अधिकारी आले असता त्यांनी डॉ ओंबासे व गुप्ता यांच्याशी चर्चा करून जिल्ह्याच्या एकंदर विकासात भारतीय स्टेट बँकेचे भरीव योगदान राहील असे आश्वासन दिले.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !