वाहतूक नियंत्रकास धक्काबुक्की करणाऱ्या विरुद्ध गुन्हा

वाहतूक नियंत्रकास धक्काबुक्की करणाऱ्या विरुद्ध गुन्हा

धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) - बस स्थानकात महिलांसाठी बाथरूमची सोय का केली नाही ? असे म्हणत वाहतूक नियंत्रणास धक्का देत केबिनच्या बाहेर काढीत धक्काबुक्की केली. या प्रकरणी धक्काबुक्की करणाऱ्या आरोपी विरोधात शासकीय कामकाजात अडथळा केल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील छोटु बाळु घुगे यांनी दि.३० ऑगस्ट रोजी ३.४५ वाजण्याच्या सुमारास मुकूंद मनोहरराव वैद्य (वय ४७ वर्षे),  वाहतुक नियंत्रक  रा. ब्राम्हण गल्ली नळदुर्ग, ता. तुळजापुर हे कार्यालयात त्यांचे काम करत असताना बाळू घुगे हा आला व बस स्थानकावर महिलांसाठी बाथरुमची का सोय केली नाही ? असे म्हणून वैद्य यांच्याशी हुज्जत घालून, अरेरावीची व असभ्य भाषा करुन वाद घालून केबीनमधून धक्का मारुन बाहेर काढून शासकिय कामकाज पार पाडण्यास अडथळा निर्माण केला. या प्रकरणी मुकूंद वैद्य यांनी सरकारतर्फे दिलेल्या तक्रारीवरून आरोपी भा.दं.वि.सं. कलम- ३५३, ३२३ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

                                                          

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !