बनावट रेखांकन व दस्ताऐवज तयार करुन शासनाची फसवणूक

बनावट रेखांकन व दस्ताऐवज तयार करुन शासनाची फसवणूक 

धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) - कळंब तालुक्यातील हावरगाव येथील तलाठी कार्यालयाचे बनावट रेखांकन व दस्तावेज तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी एका विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सतिषचंद्र भगवानदास लोढा, रा. ३८/२५, २६ येरंडवणे प्रभात रोड लाईन नं. ७, अपोझीट साईट हिराबाई बडोदेकर येरंडवणे पुणे यांनी दि. ३० जून २०२३ रोजी ६.४५ वाजण्याच्या सुमारास कळंब येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त क्र १६१५/२०२१ मध्ये बनावट प्रमाणपत्र (तलाठी कार्यालय हावरगाव यांचे प्रमाणपत्र दि.२१ फेब्रुवारी २०२० चे ) दस्तमध्ये सादर करुन बनावट रेखांकन व खोटे दस्तावेज तयार करुन शासनाची फसवणूक केली आहे. या प्रकरणी विशाल राजेंद्र गाते (वय २८ वर्षे), व्यवसाय प्रभारी दुय्यम निबंधक श्रेणी - १ कळंब रा.पाडोळी (आ.) यांनी दि.२ नोव्हेंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून भा.दं.वि.सं. कलम- ४२०, ४६७ सह नोंदणी अधिनियम कलम ८२ अन्वये कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !