युवा माहेश्वरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी श्रीकृष्ण मुंदडा

युवा माहेश्वरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी श्रीकृष्ण मुंदडा


धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) - जिल्हा युवा माहेश्वरी संघटनेच्या नवीन कार्यकारिणीनुसार अध्यक्षपदी श्रीकृष्ण मुुंदडा यांची तर सचिवपदी गोकुळ बांगड यांची निवड करण्यात आली.

जिल्हा युवा माहेश्वरी संघटनेची त्रैवार्षिक कार्यकारणी जाहीर निवडण्यात आली. प्रक्रिया माजी अध्यक्ष महेश मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली व निरीक्षक मदनलाल मिनीयार उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष अक्षय तोतला व संकेत जाजू तर सहसचिव सुयोग काकाणी, व्यंकटेश मुंदडा यांची योगेश सारडा तर  कोषाध्यक्ष मोहीत मंत्री, सांस्कृतिक प्रमुख राम मुंदडा तर आरोग्य प्रमुख संतोष मिनियार, क्रीडा प्रमुख शैलेश बांगड, समाजकल्याण प्रमुखपदी गोकुळ भराडिया, जनसंपर्कप्रमुखपदी सुजित दरक, मीडीया व आयटी सेलट सिध्दांत भन्साळी यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरावरील श्रृंखला असणार्‍या संघटनेमार्फत युवकांच्या विविध समस्या, व्यावसायिक व शैक्षणिक गरजांची पूर्तता करून त्यांना सहाय्य करण्याचे काम या संघटनेमार्फत सुरू आहे. तसेच जिल्हाभरात युवक व युवतींसाठी अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येतात. जिल्ह्यातील युवा शक्तीच्या माध्यमातून वेगवेगळे समाजहिताचे व युवा हिताचे कार्यक्रम हाती घेण्याचा मानस यावेळी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला. यावेळी युवा प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !