नूतन जिल्हा न्यायाधीश ख्वाजा व कुलकर्णी यांचा सत्कार

नूतन जिल्हा न्यायाधीश ख्वाजा व कुलकर्णी यांचा सत्कार

धाराशिव(प्रतिनिधी) - धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाचे नूतन जिल्हा न्यायाधीश - १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एफ.ए.के.एम. ख्वाजा व ५ वे सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर), एस.व्ही. कुलकर्णी यांचा धाराशिव जिल्हा विधिज्ञ मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव तर अध्यक्षस्थानी जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. खंडेराव चौरे, जिल्हा न्यायाधीश - ३ तथा अति. सत्र न्यायाधीश शंकर ठुबे, जिल्हा न्यायाधीश - ४ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश खोमणे मुख्य न्याय दंडाधिकारी पी.व्ही. मेढे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. नूतन जिल्हा न्यायाधीश ख्वाजा आणि दिवाणी न्यायाधीश कुलकर्णी यांचा सत्कार जिल्हा विधिज्ञ मंडळ पदाधिकाऱ्यांच्यावतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.खंडेराव चौरे यांनी तर
सूत्रसंचालन जिल्हा विधिज्ञ मंडळाचे सहसचिव ॲड.संजय भोरे यांनी व आभार सचिव ॲड.बाळासाहेब आवड यांनी मानले. यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ रेवन भोसले, न्यायाधीश ख्वाजा व कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा विधिज्ञ मंडळाचे उपाध्यक्ष ॲड.सारिका मुंडे-पाटील, कोषाध्यक्ष नरेंद्र वाघोलीकर, महिला सहसचिव ॲड.माधवी धोंगडे-उंबरे, महिला प्रतिनिधी ॲड.अर्चना नवले यांच्यासह विधिज्ञ, न्यायालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !