शिक्षण हेच उज्ज्वल भवितव्याचे प्रभावी साधन - अ‍ॅड. गुंड पाटील

शिक्षण हेच उज्ज्वल भवितव्याचे प्रभावी साधन - अ‍ॅड. गुंड पाटील


धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) - शिक्षण हे केवळ नोकरी किंवा व्यवसाय मिळविण्याचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकास, संस्कार, आत्मविश्वास आणि समाजात सन्मानाने जीवन जगण्यासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन रूपामाता इरा इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक तथा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. व्यंकट गुंड पाटील यांनी केले.
धाराशिव शहरातील रुपामाता इरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी व पालक यांच्या स्वागत प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मुख्याध्यापक सर्वपल्ली अरुणजीवनकुमार, उपमुख्याध्यापक व्ही. ए. पिंपरकर, रुपामाता परिवारातील गजानन पाटील, अनिकेत नवले, हर्षल मोहिते तसेच हेड मॅनेजर ए. व्ही. ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना ऍड गुंड पाटील म्हणाले की, ज्ञानाच्या बळावरच विद्यार्थी आपल्या जीवनातील ध्येय गाठू शकतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने नियमित अभ्यास, शिस्त आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले. शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थी व पालक यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सर्वपल्ली अरुण जीवनकुमार यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपमुख्याध्यापक व्ही.ए. पिंपरकर, रुपामाता परिवारातील गजानन पाटील, अनिकेत नवले, हर्षल मोहिते, मुख्य व्यवस्थापक ए.व्ही. ठाकूर यांच्यासह विद्यार्थी, पालक, शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी, सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !