तुळजापूर बस स्थानकात घाणीचे साम्राज्य ! देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना करावा लागतोय दुर्गंधीचा सामना सीसीटीव्ही कॅमेरे बंद ; चोरांचा सुळसुळाट !

तुळजापूर बस स्थानकात घाणीचे साम्राज्य !

देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना करावा लागतोय दुर्गंधीचा सामना

सीसीटीव्ही कॅमेरे बंद ; चोरांचा सुळसुळाट !

धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) - प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळ या ब्रीदनुसार प्रवाशांना सुविधा देत आहे. त्यातच लालपरी गावोगावी पोहोचलेली आहे. या बसनेच आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून भाविक दररोज दर्शनासाठी  मोठ्या प्रमाणात तुळजापूर नगरीत दाखल होतात. मात्र, बसचा दरवाजा उघडून पायऱ्यावरून खाली पाय पडताच समोर नजर जाते ती थेट कचऱ्याच्या ढिगार्‍यावरच आणि श्वास घ्यावा लागतो तो दुर्गंधीचाच. त्यामुळे आई तुळजाभवानीच्या नगरीतील बस स्थानक परिसरात नाईलाजाने कचऱ्याचे ढीग व साचलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधींचा भाविकांना सामना करावा लागत आहे.
तुळजापूर नगरीत आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल होतात. प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे बस स्थानक अपुरे पडू लागले. त्यामुळे दोन बस स्थानक उभारुन तेथे बस व भाविक यांची सोय केली गेली आहे. या बस स्थानकावर शौचालय आहेत‌. मात्र, शौचालयात पाणी असून देखील त्याचा स्वच्छता करण्यासाठी वापर केला जात असल्यामुळे महिला व पुरुष भाविकांना तेथे देखील दुर्गंधीचा सामना करू लागत आहे. तर बस स्थानक परिसरात कचरा व बाजूला कचऱ्याचे ढीग व त्यावर डुकरांचा वावर असे दृश्य पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे एखाद्या प्रवाशाला तुळजाभवानीच्या मंदिराकडे रिक्षाने जायचे असेल तर ते भाविक रिक्षा उभा असलेल्या ठिकाणी जातात. मात्र, रिक्षा कचऱ्याच्या ढिगार्‍यांमध्येच रिक्षा थांबवीत असल्यामुळे भाविकांना तो कचरा तोडवीत त्या रिक्षात बसावे लागते. इतकेच नव्हे तर त्या कचऱ्यात असलेली घाण भाविकांच्या पायथानास लागून तसेच रिक्षामध्ये जात असल्यामुळे रिक्षा जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत दुर्गंधी सोबतच असते. बस स्थानकाच्या चोही बाजूला कचरा पसरला असून प्रवेशद्वारावर कचऱ्याचा ढिगारा तर आहेच. शिवाय बस डेपोतील आतील बाजूस कचऱ्याचे मोठमोठाले दुर्गंधीयुक्त ढिगारे आहेत. 

........

व्यवस्थापक करतात तरी काय ?

बस स्थानकामध्ये येणाऱ्या प्रवाशांना एसटी महामंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त असते. ती देण्याची जबाबदारी आगार व्यवस्थाप यांच्यावर असते. या सोयीमध्ये बस स्थानक परिसराची स्वच्छता, शौचालय स्वच्छता तसेच तेथे पाण्याची टाकी बसवून येणाऱ्या प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे त्यांची महत्त्वाची जबाबदारी व प्रथम कर्तव्य आहे. मात्र, यातील कुठलीच जबाबदारी ते निभावत नसल्यामुळे ते नेमके करतात तरी काय ? असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.

......

भाविकांची वर्दळ रात्रंदिवस तुळजापूर बस स्थानकात असते. काही लांब पल्ल्याचे प्रवासी बस स्थानकामध्ये रात्रीच्या वेळी थांबतात. तसेच दिवसादेखील मोठी गर्दी असते. बसमध्ये चढताना प्रवाशांच्या गळ्यातील दागिने तसेच पर्स आणि इतर साहित्याची चोरी करण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते. गर्दीचा फायदा घेऊन आणि एक चोरटे भाविकांना दिवसा व रात्री लुटण्याचे काम करतात. त्यांची लुबाडणूक होऊ नये जर झाली तर ते चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसावेत यासाठी बस स्थानक परिसरात कॅमेरे बसविलेले आहेत. मात्र, ते कॅमेरे बंद असल्यामुळे अनेक भाविकांना लुटणारे चोरटे सहज पळून जातात आणि ते कॅमेरा देखील टिपले जात नाहीत. त्यामुळे चोरट्यांना येथील व्यवस्थापकाची साथ आहे का ? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.



Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !